ज्ञानविकास विद्यालयात १२७५ रोपांचे वाटप

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) भराडी येथील ज्ञानविकास विद्यालयाच्या विद्यार्थांनी पर्यावरणाशी मैत्री करून पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड, संगोपन करावे म्हणून सिल्लोड येथील वृक्षवल्ली टीम सिल्लोडच्या पुढाकाराने जांभूळ, जांब, कडूलिंब, चिंच, कारंजा झाडाची रोपे वाटप करत लागवड कशी करावी, संगोपन कसे करावे यासाठी सिल्लोड येथील वृक्षवल्ली टीमचे अध्यक्ष डॉ. शेखर दौड, योगेश दिवटे, डॉ संदीप गायकवाड, डॉ दीपक अपार, गजाजन काकडे, अशोक सुरडकर, श्री ब्रह्मा आदींनी मार्गदर्शन केले.